Devendra Fadnavis and Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Jalna Maratha Reservation : एवढा मोठा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशक्य; ठाकरे गटाचा आरोप

रवींद्र देशमुख

मुंबई - जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला. या घटनेमुळे संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. यावर सर्वच राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लाठीचार्जसाठी गृहमंत्र्यालयावर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, एवढा मोठा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊच शकत नाही. जे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभल्यापासून महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था समस्या निर्माण झाल्या आहेत. शिवसेना या घटनेचा निषेध करते. लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात अजित पवार-फडणवीस-शिंदेंच्या राज्यात मोर्चे-आंदोलनं करतील, त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून हल्ले करण्याचं धोरण दिसत आहे.

ज्या पद्धतीने रस्त्यावर मराठा कार्यकर्त्यांचं रक्त सांडलेलं आहे, या रक्ताचा प्रत्येक थेंब वणव्यासारखा पेटल्याशिवाय राहणार नाही. फडणवीसजी तुमचं वैफल्य जनतेवर काढू नका, असं आवाहन संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीसांना केलं.

अंतरावाली सराटी येथे मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत होतं. यावेळी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिस देखील जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT