solapur zp sakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्री, आमदार-खासदारांना बाहेर पडणे मुश्किल! घर- कार्यालयाला पोलिसांचा बंदोबस्त; शिक्षक आमदार म्हात्रे यांची बैठक उधळली

मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय मंत्री, आमदार- खासदारांना घराबाहेर पडू देणार नसल्याची आक्रमक भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली आहे. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची सोलापुरातील बैठक उधळून लावली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय मंत्री, आमदार- खासदारांना घराबाहेर पडू देणार नसल्याची आक्रमक भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली आहे. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची सोलापुरातील बैठक उधळून लावली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील २० टक्के अनुदानाच्या शाळांवरील शिक्षकांना शालार्थ आयडी मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आलेल्या आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक ठेवली होती.

त्यावेळी त्यांनी विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांचे वर्षानुवर्षांचे प्रश्न सुटावेत यासाठी बैठक होती, असे सांगितले. पण, ‘तुम्ही इथे आलातच कसे’ म्हणत मराठा समाज बांधवांनी त्यांची बैठक उधळून लावली. ‘चले जाव, चले जाव, आमदार- खासदार चले जाव’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे‘ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

आता नाही तर कधीच नाही, अशी समाजाची आक्रमक भूमिका पाहून आमदार म्हात्रे यांनी बैठक अर्ध्यावर सोडून तेथून काढता पाय घेतला. याप्रसंगी राजन जाधव, गणेश डोंगरे, विनोद भोसले, ज्ञानेश्वर सपाटे, गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी, शासकीय विश्रामगृह येथे देखील त्यांना घेराव घालण्यात आला होता. त्यावेळी त्यांना तेथूनही निघून जावे लागले. यावेळी दत्ता वानकर, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

दरम्यान, जरांगे-पाटील यांची तब्येत खालावत असल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमधील एसटीची वाहतूक देखील थांबविण्यात आली आहे. राज्यातील इतर विभागांमध्येही पोलिसांसोबत चर्चा करून वाहतूक चालू-बंद ठेवली जात असल्याची सद्य:स्थिती आहे.

आता आरक्षणाशिवाय माघार नाही

४० वर्षे अन्याय सोसला, आमच्याच लोकप्रतिनिधींनी समाजाला न्याय दिला नाही. त्यामुळे आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. सरकारने तात्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अन्यथा एकाही मंत्र्याला, आमदार, खासदाराला मराठा बांधव घराबाहेर पडू देणार नाही.

- माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज, सोलापूर

लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालयास पोलिस बंदोबस्त

मराठा आरक्षणावरून समाज बांधव आता आक्रमक झाले आहेत. राज्यातील इतर घटनांचा अंदाज घेऊन आता प्रत्येक आमदार, खासदार, मंत्र्यांच्या घरासमोर, कार्यालयाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलिसांनी लोकप्रतिनिधींना घराबाहेर न पडण्याच्याही सूचना केल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT