Home 
महाराष्ट्र बातम्या

...आता स्वस्तात घर खरेदी होणार शक्य

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यभरात बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीला चालना मिळत नाही. घरे बांधून तयार आहेत, मात्र खरेदीदार पुढे येत नाही. या परिस्थितीत बदल करण्यासाठी राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात बदल करण्याचे सूतोवाच केले आहे. 

बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आणि राज्यातील घरांच्या किमती आटोक्‍यात राखण्याच्या अनुषंगाने रेडीरेकनरच्या दराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासोबत थोरात यांनी दिली. राज्यातील बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांकडून मागणी केल्यास रेडीरेकनरच्या दरात वाढ किंवा घट करता येऊ शकते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नाही. रेडीरेकनरच्या अनुषंगाने सरकारकडे अनेक निवेदने आली आहेत. या सर्वांचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह शहरी तसेच निमशहरी भागात बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. घरांना उठाव नाही. त्यामुळे रेडीरेकनर दरात कपात केली जाणार आहे. रेडीरेकनर दरात कपात केल्यावर घर खरेदी स्वस्तात होऊ शकते. त्यामुळे घर खरेदीला उठाव होईल तसेच सरकारच्या तिजोरीत महसूलही गोळा होईल, असा यामागील तर्क असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

SCROLL FOR NEXT