आयटी पार्क sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरचे आयटी पार्क! ‘जलसंपदा’ची ५० एकर जमीन हस्तांतरणासाठी उद्योग विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; जागा विनामूल्य देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री घेणार

होटगी रोडवरील ५० एकरात आयटी पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाची जागा विनामूल्य घेण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. आता त्याठिकाणी प्लॉटिंग करण्यासाठी ती जागा उद्योग विभागाला हस्तांतरण करण्याची कार्यवाही करावी, असे पत्र उद्योग विभागाचे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : होटगी रोडवरील ५० एकरात आयटी पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाची जागा विनामूल्य घेण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. आता त्याठिकाणी प्लॉटिंग करण्यासाठी ती जागा उद्योग विभागाला हस्तांतरण करण्याची कार्यवाही करावी, असे पत्र उद्योग विभागाचे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

सोलापूर शहर-जिल्ह्यात अभियांत्रिकीची १५ महाविद्यालये असून त्यातून दरवर्षी साधारणत: साडेसहा हजार अभियंते शिक्षण पूर्ण करतात. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना अपेक्षित अशी नोकरी, रोजगार सोलापुरात उपलब्ध होत नसल्याने दरवर्षी अंदाजे साडेचार-पाच हजार अभियंते पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, बंगळुरू येथे नोकरीसाठी जातात. पण, सोलापुरात उभारल्या जाणाऱ्या आयटी पार्कमुळे अभियंत्यांचे स्थलांतर कायमचे थांबणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, सचिन कल्याण शेट्टींसह सगळे आमदार त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

आयटी पार्क उभारण्याचा निर्णय यापूर्वीच झाला असून आता जागा हस्तांतरणासंदर्भात उद्योग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. उद्योग विभागालाही पत्र पाठविले जाणार आहे. जागा ताब्यात मिळाल्यानंतर उद्योग विभागाकडून पुढील कार्यवाही होणार आहे. अंदाजे पुढील २० ते २२ महिन्यांत आयटी पार्क उभारेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन्ही विभागाची मतमतांतरे अशी...

सोलापूरजवळील होटगी रोड परिसरातील ५० एकर जमीन जलसंपदा विभागाची आहे. सध्याच्या रेडीरेकनर दराप्रमाणे ती जागा देण्याचे विभागाने निश्चित केले. परंतु, उद्योग विभागाने ती जागा आयटी पार्कसाठी विनामूल्य घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता सोलापुरातील आयटी पार्कसाठी जागा विनामूल्य द्यायची की रेडीरेकनर दराप्रमाणे द्यायची, याचा अंतिम निर्णय जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळात घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यात पूर्वीपासून लक्ष घातल्याने विनामूल्यच जागा मिळेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जमीन हस्तांतरणासाठी पत्रव्यवहार

आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाची जागा उद्योग विभागाला हस्तांतर व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयास पत्रव्यवहार केला आहे. जलसंपदा विभागालाही पत्र पाठवून हस्तांतरणाची कार्यवाही लवकर व्हावी, असे कळविले जाईल. जमिनीचे हस्तांतरण झाल्यावर उद्योग विभागाकडून आराखडा तयार करून त्याठिकाणी उद्योजकांच्या आवश्यकतेनुसार प्लॉट पाडले जातील.

- शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Video : 352 वर्षांपूर्वी कसे झालेले 'रायगड'चे बांधकाम? शिवरायांच्या काळातले अस्सल चित्र डोळ्यासमोर उभा करणारा AI व्हिडिओ व्हायरल

BMCच्या शाळांमधील सीबीएसईची पहिली तुकडी देणार दहावीची परीक्षा, ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

Sangli ZP : “चार तालुके सुरक्षित, सहा तालुक्यांत काँग्रेसची कसोटी!” सांगली राजकारणात अस्तित्वाची लढाई

KDMCमध्ये राजकीय उलथापालथ! सत्तेसाठी शिंदेंची खेळी, मनसेच्या पाठिंब्यानं समीकरणच बदललं; भाजपसह उद्धव ठाकरेंना धक्का

SCROLL FOR NEXT