nirmala sitharaman and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Budget 2023 : पारदर्शकता कशी हवी हे जगाला दाखवून दिलं; शिंदे गटाची अर्थसंकल्पावर स्तुतीसुमने

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 आज जाहीर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामण यांनी अर्थसंकल्प जाहीर करत अनेक घोषणा केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पाचे एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. (Budget 2023 news in Marathi)

उदय सामंत म्हणाले की, माझा मतदार संघ समुद्र किनाऱ्यावरील आहे. देशाच्या मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ३८ हजार ८०० शिक्षकांच्या भरतीची योजना आणली आहे. स्टार्टअपसाटी लघू आणि सुक्ष्म योजनेसाठी दोन हजार कोटींच्या कर्जवाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टील इंडस्ट्रीला लागणाऱ्या रॉ मटेरियलमध्ये सवलत देण्यात आली आहे. व्यवहारात पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान मोबाईल आणि इलेक्ट्रीक गाड्यांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्रात लवकरच महिंद्रा आणि महिंद्राने १० हजार कोटींचा एसओयू केला, अशी माहिती सामंत यांनी दिली. शिवाय करात मोठी सवलत देण्यात आली आहे. प्रत्येक गरीबाला घर असावं, त्यासाठी पीएम आवास योजनेला ६६ टक्क्यांची आर्थिक वाढ दिल्याचं ते म्हणाले.

दरम्यान सर्वसामान्यांसाठी सरकार आहे. सामान्यांना केंद्रबिंदू माणून बजेट सादर कऱण्यात आलं आहे. त्यामुळे भारत दुप्पट वेगाने प्रगती करेल, असंही त्यांनी नमूद केलं. तसेच अर्थसंकल्पात पारदर्शकता कशी असावी हे केवळ देशाला नाही तर जगाला दाखवून देण्याचं काम बजेटमधून झाल्याचं दिसून येत, असंही सामंत यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT