मुंबई : देशभरात कथित नक्षलींवर करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा मोठा डाव होता, असा गौप्यस्फोट पोलिसांनी केला. अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तेलुगू कवी वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नण गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली. ही अटक अत्यंत योग्य होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला, असेही परमवीर सिंग यांनी सांगितले.
बंदी असलेल्या नक्षली संस्थांशी संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी देशभरात नऊ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये हजारो संशयित कागदपत्रे, कॉम्प्यूटर्स आणि लॅपटॉप त्यांच्या पासवर्डसह ताब्यात घेण्यात आला असून, फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.