pistol in crime

 
esakal
महाराष्ट्र बातम्या

कामगारानेच बनविला मालकाला लुटण्याचा प्लॅन! गावाकडील सराईत गुन्हेगारांची घेतली मदत, पैसे घेऊन मालकाची कार निघाली, हातातील बंदुक दाखवून तिघांनी कार अडविली, पण चालकाने असे काही केले की प्लॅनच फसला...

सोलापूर- हैदराबाद रोडवरील मुळेगाव क्रॉस रोडजवळील ॲपेक्स स्टील ॲंड हार्डवेअर दुकानाचे मालक इब्राहिम मोतीवाला हे दिवसभर जमा झालेली रोकड दररोज चालक एजाज नबीलाल तांबोळी याच्यामार्फत घरी पाठवायचे. कंपनीतील एका कामगाराने ती रोकड लुटण्याचा प्लॅन तयार केला. त्यासाठी त्याने बोरामणी, उळे परिसरातील सात जणांची मदत घेतल्याची बाब समोर आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर- हैदराबाद रोडवरील मुळेगाव क्रॉस रोडजवळील ॲपेक्स स्टील ॲंड हार्डवेअर दुकानाचे मालक इब्राहिम मोतीवाला हे दिवसभर जमा झालेली रोकड दररोज चालक एजाज नबीलाल तांबोळी याच्यामार्फत घरी पाठवायचे. कंपनीतील एका कामगाराने ती रोकड लुटण्याचा प्लॅन तयार केला. त्यासाठी त्याने बोरामणी, उळे परिसरातील सात जणांची मदत घेतल्याची बाब समोर आली आहे. यात सोलापूर तालुका पोलिसांनी पाचजणांना अटक केली. नव्याने अटक केलेल्या दोघांना सोमवारी (ता. २०) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

ॲपेक्स स्टील कंपनीच्या मालकांच्या गाडीवर एजाज तांबोळी हा चालक म्हणून काम करतो. १५ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आठजण दुचाकी व कारमधून हैदराबाद रोडवरील महाराजा बारजवळ थांबले होते. स्टील कंपनीच्या मालकांचा चालक एजाज तांबोळी रोकड घेऊन कधी घराकडे निघतो, त्याच्याकडे नेमकी किती रोकड असते, याची माहिती कंपनीतील एका कामगाराने गोळा केली होती. त्याच्याविरुद्ध पूर्वीचा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानेच हा सगळा प्लॅन तयार केला.

एकाकडे विनापरवाना बंदूक होती, तर एक-दोघांकडे कोयते होते. त्यांचा प्लॅन फसल्यावर सगळेजण पसार झाले. पण, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलिस उपनिरीक्षक महेश घोडके यांच्या नेतृत्वातील पथकाने तपास करीत काही तासांतच पाचजणांना अटक केली. पोलिसांनी कसून तपास करीत आणखी दोघांना अटक केली. आता यातील मुख्य संशयित अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली आहेत. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. कदम करीत आहेत.

दरोडेखोरांचा असा होता प्लॅन, पण...

कारमधून रोकड घेऊन निघालेल्या एजाजला वाहन आडवे लावून थांबवायचे. त्याला बंदुकीचा धाक दाखवून कारमधील कोट्यवधीची रोकड लुटून पसार व्हायचे, असा दरोडेखोरांचा प्लॅन होता. पण, चालक एजाजने समोरील धोका ओळखून समयसूचकता दाखवून कार रिव्हर्स कंपनीत नेली. यात तो थांबत नसल्याने एकाने कारच्या दिशेने गोळी झाडली, तरीपण त्यांचा प्लॅन यशस्वी झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT