Jayant Patil 
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: "तुमच्या कार्यशैलीवर बोलायला लागलो तर अवघड होईल"; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला इशारा

Sandip Kapde

Jayant Patil: शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांची आज बैठक पार पडली. यावेळी सत्ता आपलीच येणार आहे चिंता करु नका, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. परतीचे दोर आता कापण्यात आले आहेत. आपल्याला लढायचे आहे. मतदारांच्या मनात शरद पवार आहेत, असे पाटील म्हणाले.

निवडणूक आयोगात शरद पवार यांच्या कार्यशैलीबद्दल भाष्य केलं जात. २५ वर्ष सत्ता उपभोगली, शरद पवारांच्या कार्यशैलीमुळे तु्म्हाला पदं मिळाली, तुम्ही मंत्री झालात. मात्र त्यांच्या कार्यशैलीवर २५ वर्षानंतर तुम्ही प्रश्न उपस्थित करता. मग २५ वर्ष तुम्हाला शरद पवार यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याच काय?, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

शरद पवार साहेब हुकूमशाह आहेत. ते त्यांच्या मनाने पक्ष चालवतात, अशी टीका होत आहे. मात्र आम्हाला असा अनुभव आला नाही. शरद पवार सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतात. तुमच्या कार्यशैलीवर जेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित करु तेव्हा अवघड होईल, असा इशारा जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला दिला.

जयंत पाटील म्हणाले, शरद पवार लोकशाही मानत नाहीत, असं विधान केल्या जात आहेत. या देशातील लोकशाही टीकावी पडेल ती कींमत देऊन पण मी लोकशाही टीकवण्याच्या बाजून ऊभा राहील, हे शरद पवार यांच्या कृतीतून स्पष्ट झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT