It will take 15 years to recover from corona estimates from RBI report mumbai Sakal
महाराष्ट्र बातम्या

कोरोनाच्या फटक्यातून सावरण्यास १५ वर्षे लागतील-‘आरबीआय’च्या अहवालातील अंदाज

रिझर्व्ह बँकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च’ची मते यात समाविष्ट करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या दोन वर्षांत अर्थव्यवस्थेला बसलेल्या हादऱ्यातून सावरण्यासाठी आणखीन किमान पंधरा वर्षे लागतील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या २०२२ च्या चलन आणि अर्थविषयक अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.सध्याच्या व येत्या काही वर्षांतील संभाव्य विकासदर आणि ‘जीडीपी’ची वाढ ध्यानात घेता, सर्व तोटा भरून निघण्यास सन २०३५ उजाडेल अशी शक्यताही या अहवालात वर्तविली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च’ची मते यात समाविष्ट करण्यात आली आहेत.

‘रिव्ह्यू अँड रिकन्स्ट्रक्ट’ असे या अहवालाचे शीर्षक आहे. कोरोना नंतरच्या काळात अर्थव्यवस्था सुधारणे आणि विकास दरात वाढ करणे याबाबत यात भाष्य करण्यात आले आहे. २०२०-२१ मधील विकास दर उणे ६.१६ असा राहिला होता. २०२१-२२ मध्ये तो जरी ८.९ एवढा गेला व २०२२-२३ मध्ये तो ७.२ एवढा राहील अशी अपेक्षा आहे. तरीही सर्व तोटा भरून काढायला वर्ष २०३४-३५ उजाडेल असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे. भारताचा विकास दर येती काही वर्षे सहा टक्के राहील असा अंदाज अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोरोनाचा तोटा भरून काढण्यास अनेक वर्षे लागतील असेही बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT