Amitabh Gupta esakal
महाराष्ट्र बातम्या

Amitabh Gupta: अमिताभ गुप्ता यांची एका आठवड्यात दुसऱ्यांदा बदली

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

रुपेश नामदास

Amitabh Gupta: राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही समावेश असून त्यांना अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली होती. गुप्ता यांच्या जागी आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत.

मात्र आज नव्याने झालेल्या प्राप्त आदेशात अमिताभ गुप्ता यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. गुप्ता यांची नियुक्ती आता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे येथे करण्यात आली आहे.

तर मनोज लोहिया यांची पिंपरी चिंचवड येथे पोलीस सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोहिया याआधी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते. तर गेल्या काही दिवसांपुर्वी राज्यातील पंधरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रमोशनवर बदल्या करण्यात आल्या होत्या.

यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली मुंबई अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) करण्यात आली होती. त्यांच्या जागी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. रितेश कुमार हे पुणे सीआयडीचे प्रमुख म्हणून अतिरिक्त पोलिस महासंचालक होते. सन १९९२ सालच्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत.

आज प्राप्त झालेल्या आदेशानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोठे झाल्या..

मानवी हक्क विभागाचे विशेष मूळ पोलीस माननिरीक्षक असलेले रवींद्र शिसवे यांची बदली लोहमार्ग आयुक्त मुंबई या पदावर झाली आहे. .

सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र या पदावर नियुक्ती झाली आहे.

संजय मोहिते सहपोलीस आयुक्त नवी मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे.

सुरेश कुमार मेंगडे मुख्य दक्षता अधिकारी सिडको नवी मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे.

रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे.

मनोज लोहिया सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड या पदावर नियुक्ती..

सुहास वारके विशेष मा निरीक्षक कायदा आणि सुव्यवस्था या पदावर नियुक्ती झाली आहे.

संजय दराडे अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT