महाराष्ट्र बातम्या

Jaideep Thackeray: शिंदे गटात गेलेल्या जयदेव ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंच्या पाठीशी? दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गटाच्या मेळाव्यात जयदेव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नातू जयदीप ठाकरे उपस्थित होते

सकाळ डिजिटल टीम

राज्यात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे दसरा मेळावे पार पडले. यावरून दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे. दसरा मेळाव्यात शिंदे गटाच्या स्टेजवर जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे उपस्थित होते. तर ठाकरे गटाच्या मेळाव्यात जयदेव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नातू जयदीप ठाकरे उपस्थित होते. ठाकरे कुटुंबात दिवसेंदिवस दुरावतंय का अशी चर्चा सुरु आहे. एकीकडे ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्य शिंदे गटाकडे जात असताना जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात का गेले? इथून पुढे कशी असेल त्यांची भूमिका काय असेल याबाबत सामशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

मी आतापर्यंत दसरा मेळाव्याला ऐकत होतो पण यावर्षी गेलो कारण आतापर्यंत ऐकत होतो पण यंदा जाऊन अनुभव घेतला. उद्धव काकांनी संधी दिली तर मी नक्की राजकारणात येईन बाकी कुटुंब कोणाला पाठिंबा देतंय याबाबत मला बोलायचं नाही मी बाळासाहेबांचा मोठा नातू म्हणून उद्धव काकांच्या दसरा मेळाव्यात गेलो होतो. मोठा नातू म्हणून मी जबाबदारी पार पाडतोय असंही जयदीप म्हणलेत.

पुढे बोलताना जयदीप ठाकरे म्हणाले की, मूळ शिवसेना कोणाची हे सर्वांना माहित आहे. शिवसेनेत दोन गट पडतील असं कधीच वाटलं नव्हतं. कोरोना काळात काका स्वतः आजारी असताना त्यांनी खूप चांगल काम केलं आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे येणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Hockey : खरं बोलण्याची शिक्षा! पाकिस्तानच्या कर्णधारावर दोन वर्षांची बंदी, तर बोर्डाच्या प्रमुखांचा राजीनामा

Nashik Traffic News : बेशिस्त चालकांना बसणार दंडाचा फटका; नाशिक शहरातील सीसीटीव्ही अखेर अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Karachi Blast: भयंकर! कराचीमध्ये भीषण स्फोट! १६ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटना नेमकी कशामुळे घडली?

Shivaji Maharaj Video : "जर १६७४ ला रायगडवर CCTV असतं तर..?" छत्रपती शिवरायांचा अस्सल काळ डोळ्यापुढे उभे करणारा व्हिडिओ व्हायरल

Stock Market : शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरला, 3 लाख कोटींचे नुकसान; कारण काय? कोणते शेअर्स तोट्यात?

SCROLL FOR NEXT