Amitabh Gupta Sakal
महाराष्ट्र बातम्या

Recruitment : राज्यात कारागृह विभागासाठी भरती प्रक्रिया सुरू; अमिताभ गुप्ता यांची माहिती

‘महाराष्ट्रातील कारागृह विभागासाठी नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्यात आली आहेत. विविध २५५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘महाराष्ट्रातील कारागृह विभागासाठी नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्यात आली आहेत. विविध २५५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, कारागृह सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होईल,’ असा विश्वास अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केला.

येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात मंगळवारी (ता. १६) आयोजित आधुनिक संगणक प्रयोगशाळा आणि दूरदृष्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) कक्षाच्या उद॒घाटनप्रसंगी गुप्ता बोलत होते. विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन वायचळ, फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया, अनिल बाबी, बबलू मोकाले आदी या वेळी उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून कारागृह विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ई-लर्निंग, ई-लायब्ररी, व्हर्च्युअल क्लासरूम, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा अशा सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. या अद्ययावत सुविधांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा. या कौशल्य प्रशिक्षणातून चांगले अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षक निर्माण होतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Search : काय तुमची नवीन APAAR ID तयार झालीये? Whatsapp वरचा नवा Scam गुगलवर का होतोय ट्रेंड..पाहा एका क्लिकवर

तरुणाईची झिंग पडलेली महागात! प्राजक्ता शुक्रेच्या भरधाव गाडीने दोन जणांना उडवलं अन्... मुंबईतला तो भयानक अपघात

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेत MIM गट नेते पदी माजी महापौर अब्दुल मलिक यांची नियुक्ती

Nashik News : नाशिककरांना कचरा विलगीकरण बंधनकारक! नियम मोडणाऱ्यांकडून १० लाखांचा दंड वसूल

Big Breaking : बांगलादेशचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार, सरकारची घोषणा! भारतात न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम...

SCROLL FOR NEXT