Gram Panchayat Election Result esakal
महाराष्ट्र बातम्या

Gram Panchayat Election Result: चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का, मुलीच्या पॅनलचा दारूण पराभव

राज्यात ग्रापंचायत निवडणुकांचे निकाल जाहिर

रुपेश नामदास

Chandrakant Patil BJP: राज्यात ग्रापंचायत निवडणुकांचे निकाल जाहिर झाले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपुर्वी देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणुकीचा निकाल पार पडला यामध्ये धक्कादायक निकाल लागला आणि गुजरातचं मैदान चंद्रकांत पाटलांनी मारलं. ते पण सगळे रेकॉर्ड तोडून भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलं.

मात्र गुजरात निवडणुकीत महत्त्वाची भुमीका बजावणारे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (सीआर पाटील) यांची कन्या भाविनी पाटीलला ग्रामपंचातीच्या रिंगणात पराभवाचा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात मोहाडी गावात आपले ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून निवडणुक लढवली होती.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

मात्र या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. मात्र त्यांच्या नेतृत्वात उभा असलेल्या पॅनेलला धक्का बसला आहे. भाविनी पाटील या मागील ५ वर्षे मोहाडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करत होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावात समाधानकारक विकास केला आणि गावामध्ये विश्वास प्रस्थापित केला.

मात्र यावेळी सरपंचपद महिला एसटी कॅटेगरीसाठी राखीव होतं. त्यामुळे भाविनी पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अर्ज भरला होता. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला मात्र त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाविनी पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT