महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : शिंदे गटाकडून ठाकरे-पवार गटावर दंगलीचा आरोप; म्हणाले, पकडलेला आरोपी...

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीहल्ला प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील ऋषीकेश बेदरे याच्याकडे पोलिसांना पिस्तुल सापडले होते. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटावर दंगलीचे आरोप केले आहेत.

छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, अंतरवाली येथे झालेल्या घटनेनंतर राज्यात पडसाद पडलेले पाहायला मिळाले. मुळात जालन्यात दंगल कशी घडेल, यासाठी काही बडे नेते प्लॅन बनवत होते.. बनवलेला प्लॅन अमलात आणला, घटनाक्रम पाहिला तर लक्षात येईल. कुणाच्या मृत्यूनंतरही कधीच न जाणारे बडे नेते हे तातडीने गेले होते.

शिरसाट पुढे म्हणाले, दंगल घडवणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. राज्यात दंगली घडवून सरकार कसे बदनाम होईल हा प्रयत्न केला गेला. सरकारला विनंती आहे, की मुख्य सूत्रधार शोधले पाहिजेत, पिस्टल मिळालेला आरोपी आहे का मोहरा आहे, हे शोधलं पाहिजे.

शिरसाट पुढे बोलले, ज्यांच्याकडे पिस्टल आढळली त्याला सुपारी देण्यात आली होती. मराठा आमदार सोळंके हे मराठा असूनही त्यांचा घर कुणी जाळलं? दंगलीसंदर्भात आपण अधिवेशनात आवाज उठवणार असून सगळे पुरावे मांडणार, सगळे व्हिडीओ आणि फोटो आले आहेत. रोहित पवार काय म्हणतात हे चौकशीत समोर येईल, त्या भागात कोण बैठक घेत होते हे समोर येईल. स्वतः करायचं आणि नामंनिराळं व्हायचं, असा आरोप त्यांनी केला.

दंगलीमागे संजय राऊत, राष्ट्रवादीचे युवा नेते आणि माजी मंत्री आहेत का? हे तपासामध्ये उघड होईल. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांवर दंगलीचे आरोप यावेळी शिरसाट यांनी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

Maharashtrta News : राज्याचा साखर उतारा वाढला; दीड महिन्यात ३० लाख टन साखरनिर्मिती!

Liver, Kidney, Gut Detox: फक्त १४ दिवसांत करा सगळं शरीर स्वच्छ! आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं सर्वात सोपं डिटॉक्स ड्रिंक

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT