Sharad Pawar devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Jalna Lathi Charge : 'गोवारी हत्याकांड घडलं तेव्हा...'; फडणवीसांची शरद पवारांच्या जालाना दौऱ्यावर टीका

रोहित कणसे

Jalna Protest Update : जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनात शुक्रवारी दगडफेक झाल्याचा दावा करून पोलिसांकडून लाठीमार झाला. या घटनेत अनेक पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण तापले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आज (शनिवार) जालन्यातील आंदोलनस्थळाला भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शरद पवारांच्या या जालना दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे.

जालन्यात घडलेल्या घटनेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, दुर्दैवाने पोलिसांना घेरून दगडफेक करण्यात आली. जवळपास पोलीस अधिकाऱ्यांसह १२ पोलीस जखमी झाले. त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज करताना देखील कोणी गंभीर जखमी होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात आले असे फडणवीस यांनी सांगतले. .

तेव्हा पाहायला देखील गेले नाहीत...

पुढे बोलताना फडणवीस म्हणाल की, आजच्या शरद पवारांच्या जालना दौऱ्यावर बोलताना फडणीस म्हणाले की, पवारसाहेब मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड झालं आणि त्याठिकणी ११३ गोवारी समाजाचे लोक मृत्युमुखी पडले. पवारसाहेब पाहायला देखील गेले नाहीत आणि राजीनामा देखील दिला नाही. त्यामुळे आता पवार साहेबांच्या जवळच्या लोकांनी त्यांना सोडून आमच्यासोबत सरकार तयार केल्याने ते नाराज, चिडलेले आणि व्यथित आहेत. त्यामुळे ते असे अरोप करत आहेत मी त्यांना उत्तर देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

काही कारण नसताना लाठी हल्ला केला. लोकांनी मला सांगितलं की, काही पोलिस सांगत होते की, आम्हाला कळतंय की यांची (आंदोलनकर्ते) मागणी रास्त आहे. पण आम्हाला कळतंय की आपण हे करू नये. पण वरून सुचना आहेत त्यामुळे आम्हाला केल्याशिलाय गत्यंतर नाही. आज राज्यात गृहखात्याची सुत्रे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून समाजाच्या अन्य घटकाबाबत किती अतिरेकी भूमिका घेतली जाते याचं हे उदाहरण आहे. या लाठी हल्ल्याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी एबीपी माझाला बोलताना दिली.

"महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे . जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो." असं ट्विट देखील शरद पवारांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT