महाराष्ट्र बातम्या

Jalna : तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर जालना पोलिस अधीक्षक पदाचा पदभार 'या' अधिकाऱ्याकडे

संतोष कानडे

जालनाः शुक्रवारी जालन्याच्या आंतरवाली गावात झालेल्या लाठीहल्ल्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमध्ये अनेक आंदोलक आणि पोलिसदेखील जखमी झालेले आहेत. सरकारने कारवाई करत पोलिस अधीक्षक तुषार दोशींना आज सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं.

तुषार दोषींच्या जागेवर नवीन आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयपीएस शैलेश बलकवडे हे जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असतली. जालन्यातील मराठा आंदोलनामुळे राज्यभर वातावरण पेटलेलं आहे. त्यामुळे जालन्यात शांतता ठेवण्याचे प्रमुख आव्हान सरकारसमोर आहे.

त्यामळे तुषार दोशींच्या जागी शैलेश बलकवडे यांची पोलिस विभागाने वर्णी लावली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी फोनवरुन चर्चा केलीय. मराठा आरक्षणप्रश्नी आपण तोडगा काढू, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, असं आवाहन फडणवीसांनी मनोज जरांगेंना केल्याची माहिती आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिलेय.

दरम्यान, सरकारचं एक शिष्टमंडळ मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी जालन्याच्या आंतरवालीमध्ये दाखल झालेलं होतं. त्यांनीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आंदोलकांशी बोलणं करुन दिलं. त्यामुळे मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT