Arjun Khotkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ''...तर उद्याच आरक्षणाचा जीआर घेऊन येतो'' जरांगे पाटलांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं

संतोष कानडे

जालनाः सरकारचे प्रतिनिधी म्हणून अर्जुन खोतकर सध्या जालन्यामध्ये आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करुन दिलं आहे. जरांगे पाटील यांच्याकडे असलेले पुरावे घेऊन मुंबईला जातो, असं म्हणत त्यांनी मुंबईकडे कूच केली आहे.

यावेळी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, उद्यापर्यंत नक्कीच चांगली बातमी येईल आणि हे उपोषण सुटेल. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मराठाच कुणबी असल्याचे पुरावे आहेत. ते घेऊन मी मुंबईला जात आहे. तो मसुदा सरकारसमोर मांडणार असून आज निर्णय होऊ शकतो. उद्यापर्यंत मी जीआर घेऊन येतो आणि हे उपोषण आपण सोडू, असं खोतकर म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला. थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या चर्चा झाली हे स्पष्ट होईल.

माध्यमांशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, उपसमितीची बैठक सुरु असून मुख्यमंत्री दीड-दोन तासांमध्ये निर्णय जाहीर करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाच्या बाबतीत गंभीर आहेत, असं खोतकर म्हणाले. त्यामुळे आज काही वेळात काहीतरी निर्णय होऊ शकतो, असं स्पष्ट होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT