Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : जालन्यातले समन्वयक मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मांडीवर गोळ्या झाडल्या...

संतोष कानडे

जालनाः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यामध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लागलं. पोलिस उपोषणकर्त्यांना उपचारासाठी उपचारासाठी नेणार होते. मात्र पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पुढे दोन्ही गटांमध्ये झटापट झाली. नंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांवर तुफान लाठीमार केला.

जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यामधील अंतरवलीमध्ये ही घटना घडली आहे. मराठा आंदोलनाचे समन्वयक मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'साम टीव्ही'शी बोलताना जरांगे म्हणाले की, आम्ही उपचार घ्यायला तयार होतो परंतु पोलिसांनी काहीही ऐकलं नाही. थेट गोळीबार केला.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, पोलिसांना उपोषणकर्त्यांच्या घरात घुसून हल्ला केला. त्यांनी नीट सांगायला पाहिजे होते. आणखी चार दिवस आम्ही थांबलो असतो परंतु काहीही ऐकलं नाही. इंग्रजांनी एवढे अत्याचार केले नसतील, तेवढे पोलिसांनी केले.

जरांगे पुढे म्हणाले की, आंदोलकांनी शांतता पाळावी. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची गरज होती. पोलिसांनी आंदोलकांच्या मांडीवर गोळीबार केल्याचं जरांगेंनी सांगितलं.

दरम्यान, धुळे-सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी काही वाहनं पेटवली आहेत. शिवाय उद्या बीड जिल्हा बंदची मराठा समन्वयकांकडून हाक देण्यात आलेली आहे. शरद पवार यांनीही गृहमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.

शरद पवार म्हणाले की, मला जालन्याहून एक दोन लोकांचे फोन आले. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला, शांततेने सगळं चाललं होतं. मात्र चर्चेनंतर पोलिस बळाचा वापर करुन आंदोलकांना तिथून हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. तेथील तरुणांवर प्रखर लाठीहल्ला केला आहे. यात पोलिसांचा दोष नाही. त्यांना वरुन आदेश आदेश असतील, असंही पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT