Maratha Reservation Protest  
महाराष्ट्र बातम्या

पोलिसांनी मराठा आंदोलकांवर का केला लाठीचार्ज?, जालन्यात नेमकं काय घडलं?; संपूर्ण घटनाक्रम वाचा...

सकाळ वृत्तसेवा

- उमेश वाघमारे/ दिलीप दखणे

Maratha Reservation Protest : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आज (शुक्रवार) आंदोलक आणि पोलिसांमध्ये जबर हिंसा झाली. नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या अशांत वातावरणात अप्पर पोलिस अधीक्षक राहूल खाडे, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्यासह १५ ते २० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शिवाय नागरिकांना मारला लागला आहे.

अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले. आंदोलन सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क ही सांधला होता. मात्र, त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता. या तीन दिवसांमध्ये त्यांची प्रकृती खालावल्याने आज (शुक्रवारी) पोलिस त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आले. (Maratha Reservation Protest)

यावेळी मनोज जरांगे यांच्यासोबत अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. राहूल खाडे, उप विभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी चर्चा केला. मात्र, तोडगा निघाला नाही. पोलिसांचा फौजफाटा वाढल्याने आंदोलन स्थळावरील मंडपातील नागरिक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या गावातील तीस ते चाळीस नागरिक जखमी झाले.

शिवाय अप्पर पोलिस अधीक्षक राहूल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक यांच्यासह १५ ते २० पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. जखमींवर वडीगोद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंबड येथील जिल्हा उपरूग्णालय येथे उपचार करण्यात आले आहे. दरम्यान गावात तणाव पूर्ण शांतत आहे. (latest marathi news)

दहा बसचे मोठे नुकसान-

संतप्त जमावाने सोलापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वडीगोद्री येथे तीन बस, अंतरावाली सराटी मार्गावर एक खासगी कार जाळली. तर अनेक खाजगी वाहनांसह पोलिसांच्या सुमारे दहा ते पंधरा वाहनांवर दगफेक केली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील एकूण दहा बसचे मोठे नुकसान झाले आहे.

असा घडला घटनाक्रम-

  • दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान ३०० ते ३५० पोलिसांचा फौजफाटा आंदोलन स्थळ दाखल.

  • दुपारी चार वाजेच्या दरम्यान अप्पर पोलिस अधीक्षक राहूल खाडे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी आंदोलनाशी चर्चा करण्यासाठी दाखल झाले. मात्र, तोडगा निघाला नाही.

  • थोड्यावेळाने पुन्हा पोलिस चर्चेसाठी गेले.

  • आंदोलनस्थळी एक ते दीड हजार जमावाला पोलिसांनी घेरावा घातला.

  • साडेचार ते पावणेपाच वाजेच्या दरम्यान पोलिस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची सुरू होऊन धक्काबुक्की झाली

  • पाच ते साडे पाच वाजेच्या दरम्यान नागरिक व पोलिसांमध्ये हाणामारी.  नागरिकांकडून जबर दगड फेक

  • पोलिसांकडून लाठीजार्च सह प्लास्टिक बुलेट, अश्रुधुराचा मारा केला.

  • जमाव सैरवैर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT