Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : शरद पवार जालन्यात! उपोषणस्थळी जात आंदोलकांना दिला 'हा' सल्ला

संतोष कानडे

जालनाः काल जालन्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळलं होतं. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादानंतर दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांवर तुफान लाठीचार्ज केला. शेकडो आंदोलकांवर अमानूषपणे लाठीहल्ला केल्याचा व्हिडीओ वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर व्हायरल झाला.

शरद पवारांनी कालच माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करत या घटनेत पोलिसांना दोष नसून गृहमंत्रालयाकडून आदेश आल्याचा संशय व्यक्त केला. पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ताशेरे ओढले. त्यानंतर आज शरद पवार जालन्याता दाखल झालेले आहेत.

जालन्यामध्ये शरद पवारांनी सुरुवातीला अंबडमध्ये रुग्णालयात जखमी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. जखमींची आस्थेवाईकपणे चौकशी केल्यानंतर शरद पवारांनी आंदोलनस्थळ गाठत आंदोलकांशी संवाद साधला. आंदोलनस्थळी अगोदरच खासदार उदयनराजे दाखल झालेले होते.

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे आंदोलकांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जुनीच आहे. सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे मराठा आंदोलकांना वारंवार उपोषण करावं लागत आहे.

पवार पुढे म्हणाले की, सरकारने शब्द न पाळल्यानं आंदोलन सुरु केलं होतं. मात्र बळाचा वापर करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी हवेत गोळीबार करुन आंदोलकांना हुकसावून लावलं. मोठ्या संख्येने पोलिस आंदोलनस्थळी आणले गेले.. मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही.

''एका बाजूने चर्चा सुरु ठेवली तर दुसऱ्या बाजूने लाठीहल्ला केला. आंदोलकांनी शांततेने आंदोलन सुरु ठेवावं कारण आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय'' असा सल्ला यावेळी शरद पवारांनी आंदोलकांना दिला. शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील, राजेश टोपे यांचीही उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT