महाराष्ट्र बातम्या

Jalna Politics : बबनराव लोणीकरांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक; टोपे-लोणीकर वाद शिगेला

संतोष कानडे

मुंबईः जालन्यामध्ये सध्या राजकीय वाद विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे. सकाळी माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर सायंकाळी बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

राजेश टोपे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर टोपे यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर आरोप केले होते. लोणीकरांच्या काही कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड करणं निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले होते. त्याला लोणीकर यांनीही उत्तर दिलं होतं.

लोणीकर म्हणाले होते की, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीसाठी राजेश टोपेंसोबत माझ्या बंगल्यावर बैठक झाली होती. परतूर-मंठा या दोन तालुक्यात भाजपचा व्हाईस चेअरमन द्यायचा हे ठरलेलं असताना त्यांनी ऐनवेळी पलटी मारली. काही कार्यकर्त्यांनी त्यांना या विश्वासघाताबाबत जाब विचारला तेव्हा त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप लोणीकरांनी केला होता.

त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान, बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये आता भाजप-राष्ट्रवादीचा वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय. दगडफेक करणारे नेमके कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT