Jalna - Jalgaon Railway key Features 
महाराष्ट्र बातम्या

Jalna - Jalgaon Railway : रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा होणार महाराष्ट्रात! जालना, औरंगाबाद अन् जळगाव हे जिल्हेही जोडले जाणार

Jalna - Jalgaon Railway key Features : केंद्रीय मंत्रिमंडळाने जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली, ता. १०ः जालना ते जळगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गावर देशातील सर्वात मोठ्या बोगद्यातून रेल्वेमार्ग तयार केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाने जालना ते जळगाव या १७४ किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे. यावर ७,१०६ कोटी रुपये खर्च होणार आहे. या रेल्वेमार्गाचे वैशिष्ट्य सांगताना रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा व वेरूळला हा रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे. यामुळे देश व विदेशातील पर्यटकांना या पर्यटनस्थळांना भेटी देणे सोईस्कर होणार आहे.

या रेल्वे मार्गावर रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा तयार केला जाणार आहे. या बोगद्याची लांबी २३.५ किलोमीटर एवढी राहणार आहे. यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. या रेल्वेमार्गाने मराठवाड्यातील उद्योजकांना फायदा मिळणार असून जहाजांमध्ये माल नेण्यासाठी या रेल्वेचा उपयोग होऊ शकणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील जालना, औरंगाबाद व जळगाव ही जिल्हे रेल्वेने जोडले जाणार आहेत.

मुंबईसाठी २० हजार कोटी

मुंबईच्या रेल्वेच्या विकासासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती देऊन ते म्हणाले, मुंबईत दररोज ७५ लाख लोक लोकलने प्रवास करतात. पश्चिम व मध्य रेल्वेमार्ग अधिक प्रभावी करण्यासाठी रेल्वे १० प्रकल्प पूर्ण करणार आहे. देशातील १२८ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण अमृत रेल्वे योजनेअंतर्गत केले जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT