महाराष्ट्र बातम्या

'त्या' वादग्रस्त पुस्तकाबाबत लेखक जेम्स लेनचा मोठा खुलासा

'मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही'

सकाळ डिजिटल टीम

'मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही'

जेम्स लेनच्या छत्रपती शिवाज महाराजांवरील एका वादग्रस्त पुस्तकावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील राजकीय पक्ष यावरून एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, छत्रपती शिवरायांबाबत जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरवल्याच्या आरोपावरून राज्यात राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे. मात्र यानंतर आता एक वेगळी बातमी समोर आली आहे. लेखक जेम्स लेननं स्वत: यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी माहिती देताना लेखक जेम्स लेन म्हणाले, 'शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या जेम्स लेन लिखित पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्त्रोत नव्हते. इंडिया टुडेनं ई-मेलद्वारे त्यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत या पुस्तकाबाबत त्यांनी भाष्य केलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केला नसून 'त्या' पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नसल्याचा दावा जेम्स लेननं केला आहे. याशिवाय हे पुस्तक लिहीताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही जेम्स लेननं या मुलाखतीत सांगितलं आहे.

राजकीय स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी सुरु असुन पुरंदरे यांनी जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा आरोप शरद पवार यांनी केला होता. यावर जेम्स लेन यांनी स्पष्टीकरण दिल आहे. जो कोणी माझं Shivaji: Hindu King in Islamic India पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही, असं जेम्स लेननं मुलाखतीत म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. अस्मितेबरोबर मस्ती करु नका, असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सूचवलं होतं. जेम्स लेन यांना कोण मॅनेज करत हे याची कल्पना नाही. आधी त्या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळा आणि मग बोला, असं राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. आताच का जेम्स लेनला बाहेर काढलं गेलं. इतका गोंधळ झाला त्यावेळी लेनला कुठं गाडलं होतं. इतक्या वर्षानंतर तो मिळतो. महाराष्ट्राच्या अस्मितेबरोबर मस्ती करु नका, अन्यथा परिणाम गंभीर होतील, असंही आव्हाड म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: रस्त्यावर चालणाऱ्यांसाठी मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल, वाहनचालकांसाठी मोठी सूचना!

MS Dhoni vs Gautam Gambhir: गौतम गंभीरला हटवा, धोनीला आणा...; माजी भारतीय खेळाडूचा संताप

Pune Housing Society: १८ वर्षांपासून अडकलेला प्रश्न अखेर सुटला! हडपसरमधील गंगा व्हिलेजच्या ६७२ कुटुंबांना मिळाला मोठा दिलासा, ऐतिहासिक क्षण

'तारक मेहता...' सेटवर इतका रडला 'बाघा' की, शूटिंग थांबवावं लागलं! नक्की काय घडलेलं?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची दमदार हजेरी; उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT