महाराष्ट्र बातम्या

'हत्या सुनियोजित कटातूनच'! मोमीनपुऱ्यात जमीलची गोळ्या झाडून केली होती हत्या, १२ ते १४ जणांचा समावेश असण्याची शक्यता

मोमीनपुऱ्यात राहणारे जमील अहमद (वय ५२) यांच्यावर गोळ्या झाडून मोहम्मद परवेझ मोहम्मद हारून (वय २४, रा. चुडी गल्ली, मोमीनपूरा), सलमान खान वल्द समशेर खान पठाण (रा. हसनबाग) आणि आशिष बिसेन यांनी हत्या केली.

Manoj Bhalerao

Mominpura Crime News: मोमीनपुऱ्यात राहणारे जमील अहमद (वय ५२) यांच्यावर गोळ्या झाडून मोहम्मद परवेझ मोहम्मद हारून (वय २४, रा. चुडी गल्ली, मोमीनपूरा), सलमान खान वल्द समशेर खान पठाण (रा. हसनबाग) आणि आशिष बिसेन यांनी हत्या केली. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले असली तरी, त्यांच्या खुनासाठी सुनियोजित कट रचण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे तहसिल पोलिसांनी परवेझवर कलम १२०-ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे प्रकरणात आणखी १२ ते १४ आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

जमील अहमद यांची मोमीनपुऱ्यात अलकरीम गेस्ट हाऊस नावाने चारमजली इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ते परिवारासह राहतात. खालच्या तिन्ही मजल्यावर गेस्ट हाउस आहे. २०१४ पूर्वी तिथे काही भाडेकरू राहायचे. ते खाली करीत नसल्याने जमील अहमद यांनी मोहम्मद परवेझ आणि त्याच्या वडिलांना ते खाली करून दिल्यास, या इमारतीमध्ये भागीदारी देईल असे तोंडी आश्‍वासन दिले होते. त्यानंतर २०१५ मध्ये सर्व भाडेकरू खाली झाल्यावर जमील अहमद यांनी चारमजली इमारत तयार केली. त्यातील खाली असलेल्या दुकानाच्या खोल्या विकल्या आणि उर्वरित गेस्ट हाऊस आणि घरासाठी वापरणे सुरू केले. त्यावरून मो. परवेझ याचे त्याच्याशी भांडण झाले होते.

परवेझ हा आबू खानचा भाचा असून, आबू आणि त्याच्या टोळीने अनेक ठिकाणी प्रॉप्रर्टीचे सेंटलमेंट करणे व जमिनी बळकाविण्याचे काम केले आहे. त्यामुळे मोहम्मद परवेझ प्रॉपर्टीच्या दलाली आणि त्या खाली करण्याचे काम करणाऱ्या राजू बेसा याच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्याच्यासोबत परवेझने दोन महिन्यांपूर्वी बैठक घेत जमील यांच्या हत्येचा कट रचला. यामध्ये राजू बेसासह इतर १२ ते १४ जण सहभागी असल्याचा संशय आहे. त्यानंतर प्रत्यक्षात परवेझसह सलमान खान व आशिष बिसेन यांनी गोळ्या झाडून खून केला. पोलिसांकडून टोळीच्या माध्यमातून कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.(Latest Marathi News)

परवेझवर मकोका?

जमील अहमद यांची गोळ्या झाडून खून करणाऱ्या परवेझवर मकोकाअंर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तहसिल पोलिसांनी सादर केला आहे. त्याच्यावर अनेक गुन्ह्यांत सहभागी असल्याच्या तक्रारी आहेत. ड्रग्जमाफिया आणि प्रॉपर्टीच्या गुन्ह्यात लिप्त असलेल्या टोळीशी त्याचा संबंध असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT