Jayakwadi nashik news  esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayakwadi Dam : दिलासा! अखेर नाशिकमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं

संतोष कानडे

नाशिकः नाशिक, नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी मागील काही दिवासंपासून सुरु होती. त्यासाठी आंदोलनंदेखील झाली. अखेर पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य शासनाने रात्री उशिरा काढलेल्या आदेशानंतर रात्रीतूनच नगर, नाशिकच्या प्रकल्पांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून मुळा, प्रवरा, दारणा या धरणांमधून पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे.

नगर, नाशिक जिल्ह्यातल्या या तीन धरणांमधून ८.६ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा दारणा धरणाचं एक गेट तीन इंचाने उघडण्यात आलंय. मराठवाड्यातून पाणी सोडण्याची मागणी होत असताना दुसरीकडे नगर, नाशिकमधून पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी आंदोलनं होत होती. त्यामुळे पाण्याची ही लढाई न्यायप्रविष्ट झालेली आहे.

यासंबंधीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय ५ किंवा ६ तारखेला येणं अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रातील आंदोलकांनी जायकावडीचा डेड स्टॉक वापरण्याची मागणी केली होती. परंतु राज्य शासानाने रात्री उशिरा आदेश काढून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. ४८ तासांमध्ये जायकवाडीमध्ये पाणी पोहोचण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT