Jayant Patil and Amol Kolhe 
महाराष्ट्र बातम्या

अमोल कोल्हेंच्या CMपदाबाबतच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच..

रवींद्र देशमुख

कऱ्हाडः राज्यात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे, वाढत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा भविष्यकाळात राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आणण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे सांगितले.

शिवपुत्र शंभूराजे महानाट्य पाहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील हे येथे आले होते. त्याचदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील हे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत पाटील म्हणाले, ‘‘अजित पवार, मी आणि आमच्या पक्षाचे सर्वच नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहोत. खासदार कोल्हे हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेत चांगले काम करत आहेत.

माझ्या मुलाच्या सत्काराच्या कार्यक्रमात खासदार कोल्हे यांनी माझे, माझ्या मुलाचे कौतुक केले. त्यापलीकडे त्यांच्याही भावना वेगळ्या नव्हत्या. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवणे ही आम्हा सर्वांची भूमिका आहे. येणाऱ्या २०२४ मध्ये राज्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्यात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे..’’

वेगळा अर्थ काढण्याचा काहींना छंदच

खासदार शरद पवार एखादे एखादे विधान करतात. त्या वेळी समाजातील वेगवेगळ्या स्तरात, वेगवेगळ्या पक्षातील लोक आपापल्या सोयीने त्याचा अर्थ काढत असतात, हे आतापर्यंत आपण पाहिले आहे. अलीकडे काहींना स्वतःच्या सोयीचे अर्थ काढणे हा छंदच झाला आहे. त्यामुळे ते वेगवेगळे अर्थ काढत असतात. मात्र, त्याने फारसा फरक पडत नाही, असे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT