esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil-Amol Kolhe: जयंत पाटील अन् अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले, थरारक घटनेचा VIDEO

Jayant Patil and Amol Kolhe's Crane Mishap: पुष्पहार अर्पण करून खाली येत असताना क्रेनमध्ये अचानक बिघाड झाला. अर्ध्यावर पोहचल्यावर क्रेन तुटली आणि जयंत पाटील आणि अमोल कोल्हे खाली पडण्याची शक्यता होती.

Sandip Kapde

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष आपल्या तयारीत गुंतले आहेत. अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेची सुरुवात झाल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) पक्षाने शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावरून सुरू केली आहे. मात्र यात्रेच्या सुरुवातीलाच थरारक घटना घडली आहे.

शिवनेरी गडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जयंत पाटील आणि अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले. या थरारक घटनेने उपस्थितांना भयभीत केले.

नेमकं काय घडलं?

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात आज शिवनेरी गडावरून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे, रक्षा खडसे आणि महेबुब शेख हे क्रेनमध्ये चढले होते.

थरारक घटना

पुष्पहार अर्पण करून खाली येत असताना क्रेनमध्ये अचानक बिघाड झाला. अर्ध्यावर पोहचल्यावर क्रेन तुटली आणि जयंत पाटील आणि अमोल कोल्हे खाली पडण्याची शक्यता होती. सुदैवाने, कुणालाही दुखापत झाली नाही पण यात्रेच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

सुरक्षितता आणि दक्षता

शिवस्वराज्य यात्रेच्या आयोजकांनी या घटनेची दखल घेतली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सुरक्षितता आणि दक्षता घेतली जाणार आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

शिवस्वराज्य यात्रेद्वारे राज्यातील विद्यार्थी, शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर लोकांशी चर्चा केली जाईल. त्यांनी सांगितले की, या यात्रेद्वारे महाराष्ट्राचे हरवलेले आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी आणि महायुतीला पराभूत करण्यासाठी लोकांना एकत्र आणले जाईल.पक्षाचे खासदार आणि वरिष्ठ नेते विविध ठिकाणी या यात्रेत सहभागी होतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल या प्रकरणातील चौकशीनंतर पोलीस ठाण्यातून निघून गेला

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT