Jayant Patil big statment on Dhananjay Munde joining NCP Latest Marathi Political News  
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "तो आमचाच..."

Jayant Patil big statment on Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

रोहित कणसे

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे यांना घेणे, हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

संघाबाबत तुम्ही जानता, भाजपबाबत देखील बोललं जातं की ते प्लॅन करून ते कार्यक्रम करतात. १०-१५ वर्षांपूर्वी धनंजय मुंडे भाजपच्या संस्कृतीत वाढलेलं होते, अजित पवार हे काँग्रेस कल्चरचे आहेत. पण १०-१५ वर्षांपूर्वी धनंजय मुंडे राष्ट्रवादी पक्षात आले तो अजित पवार यांना तिकडं (भाजपमध्ये) घेऊन जाण्याचा प्लॅन होता का? त्यांना घेऊन जाण्यासाठीच ते घुसले होते का? असा प्रश्न जयंत पाटलांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी सध्या भाजप करतोय तसं काही राजकारण केलं नाही. त्यामुळे मला वाटत नाही की तसा काही प्लॅन होता. तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता, असेही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील हे सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याभरात फिरत आहेत. यादरम्यान शनिवारी (27 जुलै) रोजी जयंत पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जयंत पाटीलांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्या सदस्यांची बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी हे विधान केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा, ठरलेल्या वेळेनुसार होणार निवडणूक; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

विश्वविजेता भारतीय संघ ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत बलाढ्य संघाला भिडणार; वर्ल्ड कपची तयारी, पण स्मृती मानधना नाही खेळणार?

Processed Food Side Effects: तुम्ही पदार्थ खाता की पदार्थ तुम्हाला खातो? प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळे स्थूलता,मधुमेह, हृदयरोगाचा धोका

Mumbai News: सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला एसी लोकलचा बनावट पास, कसे आले प्रकरण उघडकीस?

Medha Politics: टीका करणारे निवडणुकीनंतर गायब होतील: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; मुंबईतून येणाऱ्याच्या अंगात येत, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT