jayant patil esakal
महाराष्ट्र बातम्या

...म्हणून मी गृहमंत्री पद नाकारलं! जयंत पाटलांची कबुली

सकाळ डिजिटल टीम

सांगली : गृहमंत्री पद का नाकारलं? याचा खुलासा जयंत पाटील (jayant patil) यांनी सांगलीमध्ये बोलताना केला. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या (sangli police) नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आर. आर. पाटील (R.R.Patil) यांच्याकडून घेतलेल्या एका सल्ल्याचा किस्साही सांगितला.

गृहमंत्री पदाबाबत जयंत पाटलांनी सांगितला किस्सा

2009 साली आर. आर. पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं गृहमंत्रीपद तुम्हाला सांभाळायचंय, असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एका लग्नात गृहखातं कसं असतंय? हे आर. आर. पाटलांना विचारलं. त्यावेळी आबांनी मला ब्लड प्रेशर आहे का? डायबिटीस आहे का? याची विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर आर. आर. पाटलांनी मग तुम्ही गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील, असे मिश्कीलपणे म्हंटले. मला त्या काळात ब्लड प्रेशरचा त्रास सुरु देखील झाला. याशिवाय त्यावेळी माझ्या खाजगी सचिवाला त्रास सुरु झाला होता. गृहमंत्री झालो आणि तेव्हापासून ब्लड प्रेशरचा त्रास मागे लागला. पण आता डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नाही, असं माझं मत तयार झालं होतं, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

सांगली जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. पोलीस स्टेशन हे लोकांच्या मदतीला असतात, त्यामुळे या वास्तूची भीती वाटायला नको. लोकांना न्याय मिळण्याचा विश्वास वाटेल, असं वातावरण आपल्याला तयार करायला हवं. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पोलीस दल काम करत आहे. मोठ्या धाडसाने चोरी झालेला मुद्देमाल आमच्या पोलीस बांधवांनी परत मिळवून तो लोकांकडे सुपूर्द केला आहे, असे म्हणत जयंत पाटील सांगली पोलीस दलाचं कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT