Jayant Patil - Raj Thackeray
Jayant Patil - Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र

भाजपने बुजगावणी उभी केलीत

सकाळ वृत्तसेवा

सांगली - मार्कस् म्हणायचा धर्म ही अफूची गोळी आहे. भाजपने सध्या देशाला ही अफूची गोळी देऊन मूळ प्रश्‍नांपासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काही बुजगावणी उभी करून जे आण स्वतः करून शकत नाही, ते त्यांच्याकडून करवून घेतले जात आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी तोफ लागली.

ते म्हणाले, ‘‘देशातील मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मध्यवर्गीय, गरिबांना महागाईने घेतले आहे. संसार कसा करायचा हा लोकांपुढे प्रश्‍न आहे. अशावेळी धर्म नावाची अफूची गोळी दिली जात आहे. काही काळ माणूस त्या गुंगीत राहिल, मात्र रात्री झोपण्याआधी त्याला उद्याचा दिवस कसा काढायचा, याची चिंता नक्की वाटते आहे. सामान्यांचा भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे भोंगे वाजवले जात आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने जे काही नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन करून भोंगे लावायला हरकत असण्याचे कारण नाही. तो नियम जो कोणी मोडेल, तो कोणत्याही धर्माचा असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. मनसेने या विषयात दंगा करायचा ठरवला असेल तर त्यांची राज्यभर एवढी ताकद नाही. त्यामुळे त्यांना अन्य पक्षातून मदत झाली तर ते काही करू पाहतील, मात्र पोलिस सक्षम आहेत, ते बंदोबस्त करतील.’’

पडळकरांना टोला

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप नेत्यांना केंद्राकडून झटपट संरक्षण दिले जात आहे. त्याविषयी जयंत पाटील म्हणाले, ‘‘या लोकांना कदाचित अतिरेक्यांपासून धोका असण्याची शक्यता आहे. त्यांना दाऊदचा फोन आला असू शकतो. त्याचे कुणाशी काही गंभीर बिनसलेले असू शकते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT