Jayant Patil video  esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil :'पाच वर्षे झाली सुट्टी घेतली नाही, आता सुट्टी द्या'!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांनी पदभार स्विकारला त्या जयंत पाटील यांच्यामुळे राज्यातील राजकारण बददलं असे सांगण्यात येत आहे.

युगंधर ताजणे

Jayant Patil NCP Sharad Pawar Meeting Maharashtra : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांनी पदभार स्विकारला त्या जयंत पाटील यांच्यामुळे राज्यातील राजकारण बददलं असे सांगण्यात येत आहे. पाटील यांची राजकीय खेळी याचा परिणाम राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यावर झाला आणि त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचा विचार केला. त्यामागील मुख्य कारण म्हणजे जयंत पाटील असा सूर अजित पवार यांच्या बैठकीतून अनेक आमदारांनी आळवला. यासगळ्यावर पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

जयंत पाटील यांनी यापूर्वी देखील जोपर्यत पवार साहेबांचा पाठींबा आहे तोपर्यत मला कसलीही भीती नाही. माझ्याविषयी कुणी काहीही म्हणेल त्याचा विचार मी करत नाही. मला साहेबांनी जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विचार आहे. त्यामुळे आम्हाला जे सोडून गेले त्यांच्याविरोधात पक्षांर्तगत कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. वेळ पडल्यास कोर्टामध्ये जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले होते.

जयंत पाटील यांनी आजच्या बैठकीमध्ये जी भूमिका मांडली त्यावरुन त्यांच्या मनातील व्यथा समोर आली आहे. पाटील यांनी याअगोदर राष्ट्रवादीतील गटबाजीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले होते. पाटील म्हणाले, पहिल्यापासून साहेबांबरोबर आहे. बडवे असा शब्द वापरला जात आहे. खूप वाईट वाटते. मला पाच वर्षे पूर्ण झाली हे मला माहिती आहे तेव्हा आता मला कार्यमुक्त करा असे सांगितले. अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिले आहे.

पाटील म्हणाले, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. एका फोनवर तुम्ही सगळे आलात. पवार साहेबांच्या शब्दावर तुम्ही आलात. हे महत्वाचे आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पवारांच्या प्रेमापोटी आला आहे. आपल्या सगळ्यांना आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. मात्र पवार हे कधीही विचलित झाले नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बाजू पलटवून टाकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: महाराष्ट्रात इंधन संकटाचा स्फोट! पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा, अनेक पंपावर ‘नो स्टॉक’ बोर्ड, वाहनचालकांचे हाल

IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

Hasan Mushrif Gokul Milk Trap : अजित दादा गेले मंत्री मुश्रीफ अडकले चक्रव्यूहात, ‘गोकुळ’मधील किरकोळ चुका बनल्या गंभीर ; ईडी पुन्हा लागणार मागे?

CSK: मुंबईला त्यांच्याच भाषेत उत्तर! CSK ने रचला इतिहास जो कोणत्याही टीमला जमला नाही; 'या' बाबतीत चेन्नई ठरली नंबर १

Nagpur News: बारावीच्या परीक्षेत ‘मास कॉपी’; वर्धा, गोंदिया जिल्ह्यातील २४३ विद्यार्थ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT