Jayant Patil - Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

रंग बदलणारे व्हायरस; जयंत पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्वीट करत राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राज ठाकरेंची उत्तरसभा आज ठाण्यात पार पडली. दरम्यान झालेल्या भाषणात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्यानंतर त्यांच्या भाषणाचे पडसाद उमटल्याचं दिसत आहेत. त्यांच्या भाषणानंतर संजय राऊतांपाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्वीट करत राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी पाडव्याच्या भाषणानंतर वादावर प्रत्युत्तर म्हणून आयोजित केलेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादीचे शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यानंतर संजय राऊतांनी ट्वीट करत दिवा विझतान मोठा होतो असं म्हणत मनसेला नाव न घेता टोला लगावला आहे. त्यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट करत मनसेवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलंय की, २०१४ ला मोदींना पाठिंबा, २०१९ ला विरोध आणि आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर. तसंच वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा आणि विचारसरणी नथुराम गोडसेंची. असं म्हणत खोचक टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान जयंत पाटलांनी हा विझत चाललेला पक्ष आहे अशी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर म्हणून राज ठाकरेंनी मनसे हा पक्ष समोरच्यांना विझवत जाणारा आहे असं म्हटलं होतं. आणि जयंत पाटलांचा 'जंत' पाटील असा उल्लेख केला होता. त्यावर पुढं लिहीताना जयंत पाटील म्हणतात की, पुतण्या मा. बाळासाहेब ठाकरेंचा आणि नातं बाळासाहेबांचे विचार संपवणाऱ्या लोकांशी. वारंवार रंगरुप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत. असं ट्वीट करत त्यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर खोटक टीका केली आहे.

दरम्यान पाडव्याच्या सभेमध्ये भोंग्याच्या विषयावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. त्यावर पेटलेल्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी ही सभा आयोजित केली होती. यादरम्यान त्यांनी शरद पवारांसह अनेकांवर निशाना साधला. तसंच त्यांनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. हा धार्मिक वाद नसून सामाजिक प्रश्न असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: खिशात फक्त 20 रुपये घेऊन अमेरिकेत पोहोचले, आज अब्जावधींचे मालक! भारतीय उद्योजकाचा डंका

Khambatki Ghat Tunnel Route : सातारा-पुणे महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा! खंबाटकी घाटात 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली

Latest Marathi News Live Update : फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; पाच जण जखमी

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

SCROLL FOR NEXT