sakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट,'धरणग्रस्तांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी...'

राज्यातील धरणग्रस्तांचे सारे प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण आघाडी शासन काळात राज्याचे पुनर्वसन खाते आपल्याकडे मागितले होते, असा गौप्यस्फोट आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.

Manoj Bhalerao

Jayant Patil:इस्लामपूर (जिल्हा सांगली) : राज्यातील धरणग्रस्तांचे सारे प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण आघाडी शासन काळात राज्याचे पुनर्वसन खाते आपल्याकडे मागितले होते, असा गौप्यस्फोट आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.

आमदार पाटील यांच्या पुढाकाराने धरणग्रस्तांचा ४० वर्षांचा प्रलंबित निर्वाह भत्त्याचा प्रश्न मार्गी लागला. त्याबद्दल वाळवा व मिरज तालुक्यातील दोनशेहून अधिक धरणग्रस्तांनी राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर आमदार पाटील यांची भेट घेऊन सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, "धरणग्रस्तांनी देशाच्या विकासासाठी केलेला त्याग मोठा आहे. मात्र भावनाशून्य अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे धरणग्रस्तांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून धरणग्रस्तांचे बरेच प्रश्न मार्गी लावले असून शेवटच्या धरणग्रस्तांस न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. निर्वाह भत्त्यासारखा एखादा प्रश्न सुटला, तर बढाया मारण्याची गरज नाही. कारण तो तुमचा हक्क आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करून जिल्ह्यातील धरणग्रस्त वसाहतीत कॅम्प घेऊन बरेच प्रश्न मार्गी लावले आहेत. स्व.पतंगराव कदमसाहेब राज्याचे पुनर्वसन मंत्री असताना अधिकाऱ्यांना सूचना करायचे, मात्र अधिकारी अंगावर घ्यायला तयार नसायचे. "

पुढे जयंत पाटील म्हणाले की," आपले राज्यात पुन्हा सरकार येऊ शकते. आपण यावेळी नक्की पुनर्वसन खाते घेऊन केवळ आपले नव्हे,तर राज्यातील सगळ्या धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू." यावेळी धरणग्रस्तांचे नेते किसन मलप, धावजी अनुसे, शंकर सावंत, नामदेव नांगरे, चंद्रकांत सावंत, बाबुराव मोरे, चंदर सावंत, तुकाराम पाटील,विजय चव्हाण,प्रकाश नांगरे, आकाश पाटील,तुकाराम पाटील, प्रकाश पाटील, राजाराम पाटील, मुबारक नायकवडी, तुकाराम लाखन, उत्तम घोलप, पांडुरंग गुरव, नामदेव पाटील, दीपक वाघमारे, लक्ष्मण सावंत उपस्थित होते.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

Latest Marathi News Live Update : अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

Gautala Sanctuary: गौताळा अभयारण्यात निसर्गाचा मनमोहक जल्लोष! सीताखोरी धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Hadapsar Traffic: अवघ्या 500 मीटरसाठी 30 मिनिटे! महंमदवाडी–उंड्री रस्त्यावरील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT