Jayant Patil said, this is not a blow to Maha Vikas Aghadi Jayant Patil said, this is not a blow to Maha Vikas Aghadi
महाराष्ट्र बातम्या

जयंत पाटील म्हणाले, हा महाविकास आघाडीला झटका नाही

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर सोमवारी (ता. २७) सुनावणी झाली. शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. तसेच पुढील सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष केला. हा महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) झटका असल्याचे बोलले जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. (Jayant Patil said, this is not a blow to Maha Vikas Aghadi)

सुप्रीम कोर्टाने शिंदे गटातील आमदारांना निलंबित केले नाही, हा महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) झटका नाही. बंड पुकारलेले आमदार आम्ही शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहे. त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा काढला तर सर्व निलंबित होतील. पाठिंबा काढल्याचे कोर्टात सांगायचे नसते. ते राज्यपालांना कळवायचे असते, असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

कोर्टाच्या निर्णयानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळेच भाजपचे नेते विक्ट्री असे दाखवत आहे. ते याचीच वाट पाहत होते. कारण, प्रत्येक माणूस आशेवर असतो, असेही जयंत पाटील म्हणाले.

बंडखोर आमदारांकडून निधी मिळाला असे वारंवार करण्यात येत आहे. या मुद्द्यालाच धरून शिवसेनेच्या आमदारांना बंड पुकारला आहे. मात्र, राज्याच्या अर्थमंत्र्यांनी कोणत्या खात्याला किती निधी दिला हे सर्वांसमोर आले तर हा गैरसमज दूर होईल, असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT