jayant patil google
महाराष्ट्र बातम्या

'न्यायालय काही सांगो, OBC आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात निवडणूक नको'

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या राजकारणात भुजबळ यांची महत्वाची भूमिका

सकाळ डिजिटल टीम

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या राजकारणात भुजबळ यांची महत्वाची भूमिका

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणवार गदा आली आहे. छगन भुजबळांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे भुजबळ यांनी आताही मार्गदर्शन करावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात निवडणूक होऊ नये ही अशी आची मागणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आज ओबीसी आरक्षणासंदर्भातील काही प्रश्नांवर विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही असो मात्र न्यायालयाच्या निकालात बसून जे करता येईल ते सर्व या आरक्षणासाठी करू. ओबीसी आरक्षणासह अगामी निवडणूका पार पडतील असा विश्वासही यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले, ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात विविध विषय आहेत. दरम्यान, हे राजकीय आरक्षण जाण्याची प्रक्रिया झाली त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ओबीसींची राजकीय जनगणना करावी लागणार आहे. त्यांची जतनिहाय गणना २०११-१२ साली झाली असून त्याचा तपशील २०१४ या वर्षी गेला आहे. त्यानंतर जे सरकार सत्तेत आले त्यांनी ती माहिती बाहेर काढली नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला नाव न घेता टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Kolhapur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार

Maharashtra Railway Project : महाराष्ट्रात नवा रेल्वे प्रकल्प ! ५,४०० गावांना जोडणारा २३१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर

Paithan Accident: कालव्यातील तिघांचा लागेना ठावठिकाणा; चांगतपुरीजवळ रात्री कोसळली होती कार, शोधमोहीम सुरूच..

Latest Marathi News Live Update : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीदरम्यान पत्रकारांवर अन्याय

Kolhapur MSEDCL : कृषिपंपांची बनावट वीज बिल थकबाकी शेतकऱ्यांच्या माथी; राज्य इरिगेशन फेडरेशनचा आरोप

SCROLL FOR NEXT