Jayant Patil  
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: लाईट गेली अन्...मोबाईल टॉर्चच्या उजेडात जयंत पाटलांनी ठोकले भाषण

जयंत पाटील हे सध्या उत्तर महाराष्ट्राचा दौऱ्यावर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या उत्तर महाराष्ट्राचा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जयंत पाटील यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये ते मोबाईल टॉर्चच्या उजेडात भाषण देताना दिसत आहेत.

यंत पाटलांनी मंगळवारी (दि.28 मार्च) रात्री अकरा वाजता नाशिकमधील चांदवड विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत त्यांना मार्गदर्शन केले. मात्र, ही बैठक सुरू असतानाच अचानक लाईट गेली. मात्र, यावेळी त्यांनी आपलं भाषण न थांबवता तसेच सुरु ठेवले.

लाईट गेली तरी जयंत पाटील मात्र थांबले नाहीत. मोबाईल टॉर्चच्या उजेडात त्यांनी आपले भाषण पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्या या बैठकीची राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम 'राष्ट्रवादी पुन्हा.. वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा' या टॅगलाईनखाली राबवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT