Sharad pawar vs Ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ''तुम्हीच सांगा काय मार्ग काढायचा?'' अजित पवार गटाला शरद पवारांचा प्रतिप्रश्न; बैठकीत काय झालं?

संतोष कानडे

मुंबईः अजित पवार गटाने आज पुन्हा शरद पवारांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याशी नेमकी काय चर्चा केली, याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.

आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, पक्षातून फुटून गेलेल्या गटाने आजही शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांना त्यांनी कालप्रमाणेच विनंती केली परंतु पवार साहेब आपल्या भूमिकांवर ठाम आहेत.

जयंत पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे आमचे आमदार विरोधातच बसलेले आहेत. आमच्यातल्या ९ जणांनी सरकारमध्ये शपथ घेतली हे खरे आहे.

शरद पवार यांच्या भूमिकेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचा प्रश्नच येत नाही. फुटलेल्या गटाने पवारांनी विनंती करुन निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढा असं आग्रहाने सांगितलं. परंतु शरद पवार यांनी येवल्यामध्येच भूमिका स्पष्ट केली आहे.

''बाहेर पडलेल्या गटाने दिलगिरी व्यक्त करुन एकत्रित काम करण्यासंदर्भात पुन्हा विनंती केल्याने शेवटी शरद पवार साहेबांनी म्हटलं की, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे, आता यापुढे काय मार्ग काढायचा हे तुम्हीच सांगा.'' असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

काय म्हणाले जयंत पाटील?

आपल्या घरात कुणी आलं तर विश्लेषणात्मक टिपण्णी करणं योग्य नाही. पवार साहेबांनी येवल्याला जावून भूमिका स्पष्ट केलेली आहे. जे दहा-पंधरा दिवसांमध्ये वेगळं वागलेले आहेत, तेच येवून भेटत आहेत. जे पवारांना घरी बसा म्हटले तेच येवून भेटून विनवण्या करीत आहेत. आज विधानसभेचे २०-२२ आमदार आणि विधान परिषदेचे तीन ते चार आमदार आले होते. पवार साहेबांची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election Result : मुंबई महापालिकेच्या १६१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप महायुतीची सत्ता, विजयाची 'ही' आहेत ५ कारणे

Latest Marathi News Live Update : भाजपचा विजयरथ सुसाट! मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांमध्ये कमळ स्वबळावर फुलले

Political Violence Shivaji Peth Kolhapur : शिवाजी पेठेत बोंद्रे-खराडे गटात तुफान राडा, हवेत गोळीबार?; माजी महिला महापौरांसह पाच जखमी

Pune : शिंदेंनी ११९ उमेदवार दिले पण एकही जिंकला नाही, मनसेचं इंजिनही यार्डातच

Sai Thopate : सई थोपटे पुण्यातील सर्वात तरुण नगरसेविका, २२ व्या वर्षी महापालिका निवडणुकीत विजय मिळवत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT