jayant patil Google
महाराष्ट्र बातम्या

दापोलीत पक्षप्रवेश कोणाचा? आघाडीत कोणतीच कुरबूर नाही; जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पक्षप्रवेशासंदर्भात महाविकास आघाडीत अलिखित करार आहे, पण दापोलीमध्ये (Dapoli) पक्षप्रवेश कोणाचा होणार आहे, याची मला कोणतीच माहिती नव्हती; मात्र जे राष्ट्रवादीत आले त्यांचे पूर्वीच्या पक्षात स्थानिक नेतृत्त्वाशी मतभेद होते. प्रवेश केलेल्या तिघांपैकी एका व्यक्तीला पक्षातून काढून टाकले होते, तर अन्य दोघे पक्षातून बाहेर पडलेले होते, अशी सावध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीत कोणतीच कुरबूर नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु एकमेकांचे कार्यकर्ते प्रवेश करून घ्यायचे नाहीत, असे आघाडी करताना ठरलेले होते.

रत्नागिरीत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु एकमेकांचे कार्यकर्ते प्रवेश करून घ्यायचे नाहीत, असे आघाडी करताना ठरलेले होते. काल (ता. २८) दापोलीतील कार्यक्रमावेळी प्रवेशासाठी आलेल्यांची ओळख करून देण्यात आली. ते पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन बाहेर पडलेले होते. यावरून महाविकास आघाडीमध्ये कोणतीही कुरबूर होणार नाही तो कालचा प्रवेश होता. आज पुन्हा प्रवेश करून घेतलेले नाहीत. तिन्ही पक्षात समन्वय असून मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत.

जिल्ह्यात राष्ट्रवादी एकेकाळी मजबूत होती. खेड, गुहागर, रत्नागिरीत आमदार होते. सामंत सात वर्षांपूर्वी बाहेर पडले होते. त्यांच्याविषयी आता बोलणे योग्य नाही. त्यानंतर गुहागरचे आमदार बाहेर पडले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्व काही दिले तरीही ते का बाहेर पडले, हा प्रश्‍नच आहे. भविष्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले पाहिजे यासाठी रत्नागिरीत झालेल्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी शहराच्या अध्यक्षपदी नीलेश भोसले असून त्यांनी शहरातील पक्षीय स्थितीचा आढावा घेतला होता. प्रत्येक कार्यकर्त्यांची मते आम्ही जाणून घेतली आहेत. त्यानुसार कडक कार्यवाही होईल. मागील दौऱ्यावेळीही तालुकाध्यक्षपदाचा विषय होता तो मार्गी लागला आहे. या वेळी घेतलेल्या आढाव्यातील प्रश्‍नही सुटलेले दिसतील.

आदिती तटकरेंनी लक्ष देणे अपेक्षित

सुनील तटकरे हे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मतदारसंघातील मोठी जबाबदारी आहे. ते पालकमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्यात संपर्क ठेवून होते; मात्र जिल्हा संपर्कमंत्री म्हणून राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. त्याबाबत मी लवकरच सूचना करेन, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे पुन्हा CM? पण खरा गेम कोण खेळतोय? गणित थक्क करणारं… २ तारखेनंतरचा ‘राजकीय स्फोट’ खरा की फक्त अफवा?

Pune Traffic : नवले पूल परिसरात मोठे बदल, आता 'या' रस्त्यावरून थेट महामार्गावर प्रवेश बंद; अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

Latest Marathi News Live Update : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Kolhapur Love Marriage : लव्ह मॅरेजमुळे सासूनं छळलं, मुलगा होऊनही पतीची नाही साथ; शेवटी ५ महिन्याच्या बाळाला सोडून 'ती'ने सोडलं जग

Junior Hockey World Cup : आजपासून ज्युनियर हॉकी विश्वकरंडक; यजमान भारताला तिसऱ्या विजेतेपदाची संधी...

SCROLL FOR NEXT