nitin gadkari sakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari : गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी PFIशी संबंधीत; तुरुंगात ऐशोआरामासाठी १८ लाख खर्च

सकाळ डिजिटल टीम

नागपूरः मागच्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात असलेला जयेश पुजारी देत असल्याचं पोलिस तपासातून समोर आलेलं आहे. हा जयेश पुजारी पीएफआयशी संबंधीत असल्याची माहिती पुढे येत आहे. शिवाय तुरुंगात त्याच्यावर अदृश्य शक्तींकडून १८ लाख खर्च झाल्याचं सांगण्यात येतंय.

नितीन गडकरी यांना मागील काही दिवसांमध्ये तीन ते चार वेळा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत. तुरुंगातून धमकी देणारा जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यानेच नितीन गडकरी यांना तुरुंगातून धमकी दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रागातून त्याने गडकरींना धमकी दिली, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे. शिवाय पोलिस तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

जयेश पुजारी याला तुरुंगामध्ये नियमित मांसाहार, बेड, मोबाईल फोन मिळायचा. शिवाय मारहाण न करण्यासाठी अदृश्य शक्ती काम करत होती. जयेशवर आतापर्यंत १८ लाख रुपये खर्च झाल्याचं पुढे येत आहे. 'पीएफआयवर बंदी लावली जाते मग आरएसएसवर बंदी का नाही' असा उलट सवाल त्याने पोलिसांना केला आहे. त्यावरुन त्यांचं ब्रेन वॉश झाल्याचं स्पष्ट होतंय.

पीएफआयचे मोहम्मद अफसर पाशा, नासिर, फारुख यांनी जयेशचं ब्रेन वॉश केल्याचं तपासातून पुढे आलेलं आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या ताब्यात असलेला जयेश आता फक्त गुंड राहिलेला नसून दहशतवाद्यांच्या हातचं खेळणं झालेला आहे. नितीन गडकरी यांना त्याने तुरुंगातून धमकी दिल्याने जयेशबद्दल ही माहिती उघड झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT