Gunratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

'पोलिस यंत्रणेचा गैरवापर होतोय'; सदावर्तेंच्या पत्नीचे पुन्हा गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलन प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बल १०९ आंदोलकांना अटक केली असून त्यांची रवानगी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना देखील दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. कोर्टाच्या या निकालानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडून गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या सगळ्या कुटुंबाला धोका असल्याचे म्हटले आहे.

त्या म्हणाल्या की, सीआयडीने माझं शंभर पानांच स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे, बदला घेण्यासाठी हा व्यक्तीगत हल्ला केला आहे, ही लोकशाही नाही, फक्त त्यांना टार्गेट करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे असे त्या म्हणाल्या. तुम्ही पोलिस यंत्रणेचा गैरवापर करत आहात असा अरोप त्यांनी यावेळी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची नावे घेत केला. त्या पुढे म्हणाल्या की, ही तुमच्या घरची जाहागीरी नाही, ती संपलेली आहे, संविधानाचं राज्य आहे, काही झालं तरी आम्ही लढणार.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, असा कोणताही व्हिडिओ नाही ज्यानुसार सदावर्तेंना अटक केली, आम्ही न्यायालयाला सांगितलं, हे वाक्य आमच्या तोंडचं असेल आजच जामीन अर्ज मागे घेतो. हे टार्गेट करण्यासाठी रचलेलं कुभांड आहे. याच्यापासून माझ्या पतीच्या तसेच आमच्या कुटूंबाच्या जीवाला धोका आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडून धोका आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा वचपा काढण्यासाठी हा मुघलाई प्रमाणे कारभार चालू केलाय असा आरोप करत याच्या विरुध्द लढत राहाणार असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सोमवारी कोर्टात काय पुरावे सादर होतात ते पाहू असे देखील त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT