Jitendra Awhad  Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवबा, दादोजी कोंडदेव आणि गोत्र; आव्हाडांची पुरंदरेवर संदर्भासहीत टीका

बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपती' या शिवाजी महाराजांवरील कांदबरीतील संदर्भ देत टीका केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. आपल्या भाषणादरम्यान बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे शिवाजी महाराज घराघरात पोहोचले असं वक्तव्य राज यांनी केलं होत. त्यानंतर सोशल मिडीयावर आणि राजकारणातून त्यांच्यावर टीका होत होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपती' या शिवाजी महाराजांवरील कांदबरीतील संदर्भ देत टीका केली आहे.

दरम्यान आव्हाडांनी राजा शिवछत्रपती कादंबरीतील संदर्भ ट्वीट करत हे आम्ही सहन करणार नाही असं सांगितलं. त्यांनी या कादंबरीतील पान नं. १२६ वर लिहिलेल्या प्रकरणावरील स्पष्टीकरण देणारे संदर्भ दिले आहेत. हा फोटो ट्वीट करताना ते म्हणतात की, शिवाजी महाराज, जिजाऊ मॉंसाहेब आणि दादोजी कोंडदेव ह्यांचे गोत्र एक होते... कादंबरीकार बाबासाहेब पुरंदरे यांनी हे लिहिले आहे. असं म्हणत त्यांनी गोत्र एक कुणाचे असते? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते पुढे म्हणतात की आम्ही विरोध केला तर आम्ही जातीयवादी...आम्ही मेलो तरी हे सहन करणार नाही. असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान संदर्भ दिलेल्या या प्रकरणात दादोजी कोंडदेव यांचे शहाजी महाराज, मॉंसाहेब जिजाऊ, शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबाशी असलेल्या संबंधावर भाष्य केलेलं आहे. पंत हे भोसल्यांच्या घरात मायेचे, ममतेचे आणि धाकाचे, दराऱ्याचे वडीलधारी पुरुष होते असं यामध्ये लिहीलेलं आहे. तसंच शहाजी महाराज आणि त्यांचा राजकारणातील स्वभाव सारखाचं होता, तसंच शिवबांचं, आईसाहेबांचं आणि दादोजी कोंडदेव यांचं गोत्र एकच होतं असंही यात लिहिलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

WPL 2026 All Team Players: दीप्ती शर्मा महागडी खेळाडू, तर मुंबई इंडियन्सनेही केरसाठी मोजले ३ कोटी; पाहा लिलावानंतरचे सर्व संघ

Rajan Patil: ''त्या' दोघांना मानवी विष्टा खायला घातली'', पंडित देशमुख खून प्रकरणाची धक्कादायक पार्श्वभूमी

Barshi Crime : बार्शीत एसटी वाहकाला मारहाण; कॉलर पकडून धमक्या, ३ हजार रुपये गायब; दोघांवर गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT