Jitendra Awhad Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती.

सुधीर काकडे

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याची माहिती भाजपनेते किरीट सोमय्या यांना दिली. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात ही कारवाई झाल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे. ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर काही वेळातच त्यांना जामीन मिळाल्याचं सांगण्यात येतंय. त्यावर भाजप नेते राम कदम यांना त्यांच्या जामीनावरून राज्याच्या पोलिस प्रशासनावर टीका केली.

राज्यातील जनतेवर अनैसर्गिकरित्या लादल्यागेलेलं सरकार आल्यापासून अन्यायाच्या आणि लोकांच्या छळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या. करमुसेना यांना जी मारहाण झाली ती निदंणीय होती असं राम कदम यांनी यावेळी सांगतिलं. जितेंद्र आव्हाड यांना ज्या पद्धतिनं अटक करून लगेच जामीन मिळाला तसा दुसऱ्या कोणाला मिळाला असता का असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला. या प्रकरणी त्यांनी पोलीस खात्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.

खोटे गुन्हे दाखल करणे, वसूली करणे हा वाईट काळ महाराष्ट्रानं कधीही पाहिला नव्हता असं वक्तव्य राम कदम यांनी यावेली केलं. दरम्यान, या प्रकरणानंतर भाजपनेते किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : ४२ वर्षांनंतर ताजमहल केस नंबर १३३८१ संपली! १९८४ दाखल झालेल्या या याचिकेत नेमकं काय होतं? खरं कारण माहिती आहे का?

Junnar News : कठोर मेहनत, शारीरिक परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर नितीनने मिळविले यश

Human Numerology : 'या' 4 मुलांकाचे लोक असतात सायको; भयानक सूडबुद्धी, यांच्याशी दुश्मनी करण्याआधी दहा वेळा विचार करा

Pune Khed Kadadhe News: कडधे येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात १३९५ दाखल्यांचे वाटप, नागरिकांना विविध योजनांचा लाभ

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

SCROLL FOR NEXT