jitendra awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad News : "ज्यांना पोसलं तेच कृतघ्न..."; वाढदिवसाच्या दिवशीच आव्हाड भावनिक

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज (५ ऑगस्ट) रोजी वाढदिवस आहे. यानिमीत्ताने अनेक कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी येतात. मात्र जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असून, या पोस्टमध्ये आव्हाडांनी आज मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही, असं सांगितलं आहे.

आव्हाडांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार, या सगळ्या बाबी अस्वस्थ करणार असल्याचे म्हटले आहे. या कारणामुळेच कोणाला भेटावं असं अजिबात वाटत नसल्याचे आव्हाड म्हणाले आहेत.

आव्हाड नेमकं काय म्हणालेत?

"उद्या 5 ऑगस्ट... माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही" असं आव्हाडांनी स्पष्ट केलं आहे.

"देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही."

मी अज्ञातस्थळी जाणार...

"तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा. मी आज रात्री बारापासून ते उद्या रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे" असेही आव्हाड म्हणालेत.

"लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे" असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT