Maharashtra Minister Jitendra Awhad Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

मी माफी मागण्याशिवाय काही करू शकत नाही - जितेंद्र आव्हाड

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पेपर फोडणे हा गोपनियतेचा भंग आहे. त्यामुळे मी व्यथित आहे. मी देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा दिल्या आहेत. पण परीक्षा घेण्याची पहिली वेळ होती. आता फटका बसला. पण, यानंतर मात्र काळजी घेणार आहे. मी माफी मागण्याशिवाय काही करू शकत नाही. पण मी जबाबदारी घेतोय, असं गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Maharashtra Minister Jitendra Awhad) म्हणाले.

म्हाडाचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे ऐनवेळी म्हाडाची परीक्षा रद्द करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री २ वाजता ट्विटरवर एक व्हिडिओ जारी करत परीक्षा पुढे ढकलल्याचे सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली होती. पण, आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला होता. अनेक विद्यार्थ्यांनी निदर्शने देखील केली. यापूर्वी देखील आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सरकार परीक्षा घेण्यात वारंवार अपयशी का ठरतं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

म्हाडानं लक्ष ठेवल्यामुळे प्लॅन बी यशस्वी झाला नाही - आव्हाड

पेपर फोडण्याचा प्लॅन ए होता. पण, पेपर फुटला नाही. कारण त्यावर आमचा दबाव होता. पेपर फुटला तर प्रीतेश देशमुख जबाबदार असेल हे स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांनी प्लॅन बी केला होता. म्हणजेच परीक्षेनंतर ज्या विद्यार्थ्यांबरोबर व्यवहार झाला होता त्यांचे गुण वाढवून देण्याचा प्लॅन होता. पण, म्हाडाने लक्ष ठेवल्यामुळे प्लॅन बी देखील यशस्वी झाला नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्याबाबत TCS ला संपर्क केला आहे. याबाबत ६० दिवसात प्रक्रिया पूर्ण करणार आहे, असंही आव्हाडांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT