Crime News: टीव्ही पाहताना चुकून चॅनेल बदललं; पत्नीला संताप अनावर, विळा उचलला अन्... पतीसोबत धक्कादायक कृत्य घडलं

Husband Wife Fight News: टीव्ही चॅनल बदलण्यावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतप्त पत्नीने पतीवर कोयत्याने हल्ला करून त्याच्या डोक्याला आणि गालाला दुखापत केली.
TV Remote Fight

TV Remote Fight

ESakal

Updated on

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील छोला मंदिर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक वादाचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. टीव्ही चॅनल बदलण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीवरून पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला आणि पत्नीने पतीवर कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी केले. पतीच्या डोक्याला आणि गालाला गंभीर दुखापत झाली. जेव्हा जखमी पती तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला, तेव्हा पत्नीने त्याच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com