Jitendra Awhad has responded to Raj Thackeray criticism of Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

"शरद पवारांचे नाव घेतले की…"; राज ठाकरेंच्या टिकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

तब्बल दोन वर्षांनंतर मनसेचा गुढी पाडवा मेळावा शिवाजी पार्क येथे पूर्वीच्याच उत्साहात पार पाडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जातीवादाचे आरोप केले आहेत. यानंदर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला, तसेच १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. तसेच त्यांनी आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार पुढे असा सवालही त्यांनी केलाय केला.

'तो त्या जातीचा हा या जातीचा असं म्हणत फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं आमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे. आम्हाला इतिहास वाचायचा नाही. लिहिला कोणी, पुरंदरे, ब्राह्मण, अच्छा म्हणजे यांनी चुकीचा लिहिला असणार,' असे देखील ते म्हणाले.

यादरम्यान राष्ट्र्रवादीचे नेत जितेंद्र आव्हाड यांनी, राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विट करत राज ठाकरे यांच्या विधानांचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, " जातीपातीचे राजकारण आपण कधी बंद करणार आहेत - राज ठाकरे. झेंडा पाहून घ्या एकदा …. विषय संपला…नीळा ….भगवा …हिरवा" अशा शब्दात आव्हाडांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

आव्हाड यांनी पुढे ट्वीट करत, "शिवरायांच्या महाराष्टात गाडलेल्या जेम्स लेन ला परत वरती काढायची गरज नाव्हती ... जेम्स लेन चे जन्मदाते हे कोण होते हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे ...जे गेले त्यांच्या बद्दल बोलणे आमच्या संस्कृतीत नाही." असे राज ठाकरे यांना त्यांनी सुनावलं आहे.

तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहीलं की, "प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात-पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील, शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच ... हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा." असेही आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT