Jitendra Awhad made serious allegations against Shiv Sena leader and thane muncipal Commissioner 
महाराष्ट्र बातम्या

'माझ्या राजकीय खूनाचा प्रयत्न होतोय', जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेवरुन (Thane Municipal Corporation ward structure) राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे, ठाण्यातील शिवसेना (ShivSena) नेत्यांवर तसेच ठाण्याच्या आयुक्तांवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रावादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हल्लाबोल केला आहे. आव्हाडयांनी मोठा गोप्यस्फोट करत माझ्या राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे.ओ

आव्हाड म्हणाले की, आघाडी व्हावी ही माझी इच्छा आहे, पण तुम्हाला करायचीच नसेल तर त्याला कोण काय करणार, माझाच जर राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला तर मी बतावात्मक भूमिका घेणार की नाही असे देखील ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, माझ्या मतदार संघातील जागा 23 वरून 18 वर आणल्या, तिथंच लोकल याच्यात आमच्या मारामाऱ्या झाल्या असत्या. त्यातच कळव्याचा एक वॉर्ड बनवताना तो मुंब्रा पर्यंत नेला, निवडणूकीला लागणारं कुठलंही गणीत लावलं गेलं नाही असे ते म्हणाले. पालकमंत्री असे प्लॅन करत नाहीत, आयुक्तांनी त्यांच्या मनाने केला असेल करतात. एकून चोविस जागा आहेत, त्यात सात हिंदू जागा आहेत , त्यामुळे त्याच्यात मला मुस्लिम द्वेशाचा प्रकार असल्याचे दिसते असे आव्हाड म्हणाले.

ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या काळात देखील इतका त्रास झाला नाही, ठाण्यात आघाडी व्हावी हे माझं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं. मी एकनाथ शिंदेंवर थेट आरोप करणार नाही, त्यांनी मला असं कळलं होतं की, एकनाथ शिंदेंनी असा निरोप दिला होता की, ५१-२१ होऊद्या, ज्यामुळे वाद होणार नाहीत. या दरम्यान माझ्यामते ठाण्यात आघाडी व्हावी त्यात दोघांचा फायदा असल्याचे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : Vaibhav Suryavanshi ला 'राष्ट्रीय बाल पुरस्कार'! १४ व्या वर्षात पठ्ठ्याने गाजवलंय क्रिकेटचं मैदान, विजय हजारे ट्रॉफीतून घेतली माघार

Explained: अरवली पर्वतरांग मुगलांसाठी कशी ठरली वरदान? 300 वर्ष टिकलेल्या साम्राज्यामागचं रहस्य, आजही आहे भारताच्या पर्यावरणाची ढाल

Real Estate 2026 : नवीन वर्षात घरांच्या किंमती वाढणार की कमी होणार? कोणत्या घरांसाठी जास्त मागणी असेल? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाचा आगळावेगळा नियम; उमेदवारांची घेणार लेखी चाचणी

Mumbai Indians ने रिलीज केलेल्या खेळाडूने इतिहास घडवला, २४ वर्षांच्या पोराने जाँटी ऱ्होड्सचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच...

SCROLL FOR NEXT