Jitendra Awhad Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : आत्ताची कारणं खोटी, गद्दारी करायचं आधीच...; आव्हाडांनी सुनावलं!

राज्यातला सत्ताबदल करण्यासाठी मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी काऊन्सिलिंग करण्यासाठी बैठका घेतल्याचं आज तानाजी सावंतांनी सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. २०१९ चा सत्ताबदल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी घडवून आणल्याचं सावंत म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल एक ट्वीट केलं आहे. यामध्ये गद्दारी करायची हे आधीच ठरलं होतं, असंही आव्हाड म्हणाले आहेत. तसंच आत्ता हे देतायत ती कारणं खोटी असल्याचं सिद्ध होतं, असंही आव्हाड म्हणाले.

आव्हाड म्हणाले, "आज सत्य समोर आलं. सत्ताबदलामध्ये तानाजी सावंत यांचे काम हे काऊन्सिलिंग आणि मिटिंगचे होते. त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर १००-१५० बैठका घेतल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर १००-१५० बैठका घेतल्या."

"आमदारांचं मतपरिवर्तन केलं आणि मग सत्ता परिवर्तन झालं. म्हणजे सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT