Jitendra Awhad 
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: "वळसे पाटील मुंबई ते आंबेगाव मॅरेथॉनमध्ये धावतात का?"; शरद पवारांचं वय काढल्यानं आव्हाडांचं प्रत्युत्तर

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी दिलीप वळसे पाटील यांना देखील टोला लगावला. शरद पवार यांच्यावर वयावरून टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिले

Sandip Kapde

Jitendra Awhad: शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी दिलीप वळसे पाटील यांना देखील टोला लगावला. शरद पवार यांच्यावर वयावरून टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार तुम्ही यांचे परतीचे दरवाजे बंद करा. ते तुमच्यावर बोलले. तर एका मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल. ते तुमच्या वयाबद्दल बोलतात. दिलीप वळसे पाटील या वयात काय VT ते आंबेगाव Marathon धावणार आहेत का?

२०१९ चे बंड केल्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसवणं ही एनसीपी ची सगळ्यात मोठी चूक होती. जिथे जिथे संधी मिळाली तिथे साहेबांचा माणसांचा अपमान केला. दत्ता मेघे यांच्या उदाहरण आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी सुनिल तटकरे यांच्यावर देखील टीका केली. आव्हाड म्हणाले, "मला आश्चर्य वाटतं तटकरे यांचं... मैत्रीसाठी मला सोडून मुलीला पालकमंत्री केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की तुला रायगड च द्यायच होते. पण ते अजित पवार यांच्यामुळे शक्य झालं नाही. मैत्रीला जागले दादा. २०१९ चा बंडात सर्वात मोठा हात सुनील तटकरे यांचा होता. तुम्ही हे घर फोडले. तुमच्या घराची काय स्थिती आहे? तुम्ही जे पेराल तेच उगवेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT