jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

jitendra Awhad: "तुका म्‍हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा" आव्हाड संतापले

धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर केलं वादग्रस्त वक्तव्य

रुपेश नामदास

धीरेंद्र महाराज शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

तर आव्हाडांनी या महाराजांना "जोड्याने मारल पाहिजे याला. असं ट्विट केले आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "या असल्या नकलाकार बाबांनी आमच्या महापुरुषांच्या बाबतीत तोडलेले अकलेचे तारे बघितल्यावर तुकोबारायांच्या शब्दातच सांगायचं म्हटल तर.

"तुका म्‍हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा" ही उक्ती योग्यच वाटते. अन व्यावहारिक भाषेत बोलायचं म्हटल तर,"जोड्याने मारल पाहिजे याला..!"यावरच समाधान होत. हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान या वादावर रोहित पवार यांनी ही संताप व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे.

बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले..?

"महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या पत्नी रोज मारत असत. त्यांना रोज काठीने मारत होते. यावेळी त्यांना कोणीतरी विचारले तुम्हाला पत्नी मारते, तुम्हाला काहीच वाटत नाही का. तर तुकाराम महाराज म्हणाले, देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली.

प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. पत्नीच्या चक्करमध्ये पडलो असतो.

पण मारणारी पत्नी मिळाली तर मला संधी मिळाली देवावर प्रेम करण्याची," असे वादग्रस्त विधान बागेश्वर महाराजांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule: 1 सप्टेंबरपासून खिशावर मोठा परिणाम! LPG, दूध, ITRसह 5 नियम बदलणार; जाणून घ्या काय स्वस्त-महाग होणार

Aditi Tatkare: मंत्री आदिती तटकरेंच्या PROचा मृत्यू, शतपावलीला गेले अन् अचानक कोसळले

मराठमोळ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत दमदार एंट्री; 'झी मराठी'च्या या सिरीयलचा आहे हिंदी रिमेक; फोटो पाहून ओळखू शकाल?

Marathi News Live Updates : शिवरायांच्या शेजारी मोदींचा फोटो नको, पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अमित ठाकरे आक्रमक

सातव्या थरावर चढून बालगोविंदाने सलामी दिली, अचानक सेफ्टी बेल्ट तुटला अन् खाली कोसळला; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT